google.com, pub-4617457846989927, DIRECT, f08c47fec0942fa0 Learn to enjoy every minute of your life.Only I can change my life.

Wednesday, September 14, 2016

लोकांना विसरु नका.

एक बाई मोलकरीण म्हणुन एका राजमहालात काम करत असते.

तिला लहान मुलगा असल्याने ती त्याला तिच्या सोबतच कामाला येतांना घेऊन यायची.

एक दिवस त्या मुलाला खेळता खेळता राजमहालात हिरा सापडतो,

तो मुलगा तो हिरा घेऊन पळत आईकडे जातो आणि सांगतो की, "आई बघ मला हिरा सापडला !"

मोलकरीण हुशार असते.
तिला वाटते, हा हिरा घेऊन आपण राजमहालाबाहेर जाऊ शकणार नाही !

ती मुलाला म्हणते, "नाही रे ! काच आहे, हा हिरा नाही.", असे म्हणुन ती तो हिरा बाहेर फेकुन देते.

काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हिरा सोबत घेऊन जाते.
मग ती तो हिरा सोनाराकडे घेऊन जाते. सोनाराला कळतं की, हिला हा हिरा कुठंतरी सापडला असणार,
हिला काय माहीत ? हा हिराच आहे ! म्हणुन तो सोनार तिला म्हणतो, "हा हिरा नाही, ही तर काच आहे!"

आणि असे म्हणुन तो पण तो हिरा बाहेर फेकुन देतो.

जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हिरा घेऊन येतो व जोहरीकडे घेऊन जातो.

जोहरी हिरा पाहतो, त्याला कळतं हा हिरा अनमोल आहे, त्याची नियत खराब होते.
तो हिरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो आणि "काच आहे", असं म्हणतो.

जसा हिरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. हे सगळं एक वाटसरु लांबुन पहात असतो.
तो त्या हिऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, "मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकलं तेव्हा तु तुटला नाही,
पण आता का तू तुटला ?"

हिरा म्हणतो, "जेंव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले तेव्हा ते माझी खरी किंमत जाणत नव्हते.

परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता तरी त्याने मला फेकले !
हा आघात मी सहन करुच शकलो नाही,
म्हणुन मी तुटलो."

मनुष्याच्या बाबतीत असेच होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमचं मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.
म्हणुन कधीही आपल्या लोकांचं जराश्या स्वार्था करता मन तोडु नका...
आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणसं
हिऱ्यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका...
     गरज संपताच लोकांना विसरु नका.
🙏🏻🙏🏻

भारतीय

🌺🌺भारतीय🌺🌺

एकदा एक भारतीय नोकरीसाठी अमेरिकेत गेला. काही दिवस खटपट करून त्याला एका सुपर मॅालमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. मालकाने त्याला बोलावले व पूर्वानुभवाबद्दल चौकशी करून त्याला नोकरी दिली.

दुस-या दिवशी तो गृहस्थ कामावर आला. दिवसभर काम भरपूर करावं लागेल असे मालकाने सांगितले. मॅालची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ अशी होती. पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर मालक त्याच्याकडे आला व किती ग्राहक केले असे विचारले. त्या भारतीयाने सांगितले की फक्त एकच ग्राहक केला.

मालक चिडला व म्हणाला बाकीच्यांनी  प्रत्येकी पंधरा ते वीस ग्राहक केले आणि तू फक्त एक ! तुझा असा परफॅार्मन्स असेल तर मला तुझ्या बाबत विचार करावा लागेल.

मालक चिडूनच पुढे म्हणाले किती डॅालरचा व्यवसाय केलास ? कारण एका ग्राहकाकडून असे कितीसे मिळाले असतील...? असा विचार मालकाने केला. तो गृहस्थ म्हणाला दीड लाख डॉलर !

क्काय ! मालक जवळजवळ ओरडलाच ! बाकीचे सेल्समनही अचंबित झाले. मालक म्हणाले, काय विकलेस तू त्याला ?

तो म्हणाला एक मासे पकडायचा गळ विकला.

पण त्याचे एवढे पैसे कसे..?
मी त्याला फिशिंग रॅाडही विकला. मग गळाला लागणारे खाद्य  विकले. मासे जास्त जिथे मिळतात त्या ठिकाणचे पाणी खोल आहे व तो भाग दुर्गम आहे, त्यामुळे बोटीने जावे लागेल, म्हणून आपल्या बेसमेन्टमधल्या गोडावूनमधून एक डबल इंजीनवाली मोटरबोट विकली. तिकडे आठवडाभर रहाव लागेल म्हणून पुरेल एवढे खाद्य पदार्थ व दोन क्रेट बीयरही त्यालाच विकली सर ! एव्हाना मालकाचा ऊर आणि डोळे दोन्ही भरून आले होते.

मालक म्हणाले, कसला रे माणूस आहेस तू ? केवळ एक गळ विकत घ्यायला आलेल्या माणसाला तू हे विकून दाखवलेस...!

तो गृहस्थ म्हणाला, नाही सर, तो माणूस डोकेदुखीवरचे औषध व बाम  मागत होता. मी त्याला पटवून सांगितले की, डोकेदुखी घालवायची असेल तर फिशींग करा. आणि हे सर्व घडून आले.

मालक म्हणाले, आजपासून तू माझ्या खुर्चीत बस बाबा ! गुरु आहेस तू कुठे काम करत होतास भारतात !

तो म्हणाला, महाराष्ट्र राज्यात शिक्षक होतो !!!!
२०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा शासनाने बंद केल्यामुळे ईकडे आलो..........
😊😊😊😊😊😊😊

अच्छे विचार करे विचार

  पहचान की नुमाईश, जरा कम करें... जहाँ भी "मैं" लिखा है, उसे "हम" करें... हमारी "इच्छाओं" से ज़्यादा "सुन...